चिपळूण :चिपळूण पंचायत समितीच्या कृषी विभागातंर्गत १३० ग्रामपंचायतीतून एक दिवस मिशन बंधारे लोकसहभाग व श्रमदानातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चिपळूण तालुक्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेंतर्गत तालुक्यात विजय -बंधारे २०१, वनराई बंधारे ५२, कच्चे-बंधारे २२० असे एकूण ४७३ बंधारे बांधण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन बंधारे मोहीम ही पाणी अडवण्याच्या हेतूने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल थीमचे काम चिपळूण गटांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आले. तालुकास्तरावर १३० ग्रामपंचायतीमध्ये मिशन बंधारे अंतर्गत एक दिवस बंधाऱ्याकरिता मोहिमेचे नियोजन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सभेमध्ये केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. चिपळूण गटातील १३० ग्रामपंचायतीमध्ये एक दिवस मिशन बंधारे मोहीम अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. मोहीमेत ग्रामपंचायत पातळीवरील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी पदाधिकारी सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, उमेद समूहातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळेतील, विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, गावातील तरुण युवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ, कृषी विद्यालयातील विद्यार्थी व महिलांचा सहभाग तसेच नाम फाउंडेशन, एक्सेल इंडस्ट्रिज लोटे, घरडा कृषी संसाधन केंद्र लवेल, टी.डब्ल्यू.जे. फाउंडेशन, अर्थ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
यावेळी कृषी विकास अधिकारी सुनील खरात, जिल्हा कृषी अधिकारी मुळीक यांनी सावर्डे येथील बंधाऱ्याला भेट दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 14/Dec/2024














