रत्नागिरी : खालगाव शिंदेवाडी येथे शेतात काम करताना साप चावलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव शिंदेवाडी,रत्नागिरी येथे शेतात काम करताना साप चावलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शुक्रवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा.मृत्यू झाला.

गणपत गोविंद पाल्ये (59, रा.शिंदेवाडी खालगाव,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास ते उंबर खरी, शेतामध्ये काम करत असताना त्यांना साप चावला होता. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 14-12-2024