गुहागर : गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील श्रीदत्तगुरू सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंतीनिमित्त यंदा रौप्य महोत्सवी कार्यक्रम १४ डिसेंबर व १५डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. १४ रोजी उमराठ गावात श्रीदत्तगुरु पादुका पालखीची मिरवणूक, विद्यार्थी सत्कार, मुलांचे रेकॉर्ड डान्स् तसेच १५ रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान कार्यक्रम, माहेरवाशीण व जावई सत्कार, लॉटरी लकी ड्रॉ सोडत, लॉटरीमधील यशस्वीतांचा बक्षीस वितरण सोहळा, मान्यवर सन्मान, रात्री कोकणचा साज संगमेश्वरीबाज असे कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 14/Dec/2024














