संगमेश्वर : पोलिस पाटलांचे मराठा आरक्षण सर्व्हेचे मानधन रखडले

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचे काम केलेल्या पोलिसपाटील यांना अद्याप प्रशासनाकडून ठरलेले मानधन न मिळाल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. सहा महिने उलटून गेले तरी या गोष्टीकडे संगमेश्वर तहसीलदार दुर्लक्ष करत असल्याचे येथील पोलिसपाटील यांचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचे काम तालुक्यातील बहुतांश गावांत पोलिस पाटीलांनी पूर्ण केले. तर काही ठिकाणी पोलिसपाटील नसल्यास किंवा गावाची व्याप्ती अधिक असल्यास हे काम अंगणवाडी सेविका यांनी पूर्ण केले. परंतु, पोलिस पाटीलांनी वेळेत काम पूर्ण करूनही ठरलेले मानधन त्यांना अद्याप मिळालेले नाही. पोलिसपाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी पाठपुरावा केला असता याकडे तहसीलदार कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 14/Dec/2024