माखजन : संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीक मोर्डे येथे श्री स्वामी समर्थांच्या मठात चिपळूणचे गायक विशारद गुरव यांची गायन मैफिल होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. २३ रोजी सायं. ५.३० वा. हि गायन मैफिल होणार आहे. हार्मोनियम साथ सुशील गद्रे, तबला साथ अथर्व आठल्ये करणार आहेत. या मठात २२ ते २४ या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 14/Dec/2024














