मानवाची प्रत्येक कृती विज्ञानाशी निगडित : मंगेश भोसले

सावर्डे : मानवाची कोणतीही कृती ही विज्ञानाशी सुसंगत आणि निगडित असते. आपल्या लहानपणापासूनच वैज्ञानिक विचारांचा आरंभ होतो. प्रत्येक व्यक्ती ही जीवनामध्ये जगत असताना वैज्ञानिक विचारानेच जगत असते, असे प्रतिपादन प्राचार्य मंगेश भोसले यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे आंबतखोल या विद्यालयात भरविण्यात आलेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेचे प्राचार्य मंगेश राजाराम भोसले यांचे शिक्षण व विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

यावेळी चिपळूण तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, आस्मा देसाई-पटेल, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक उपस्थित होते.

मांडकी मुख्याध्यापक अमर मार्गदर्शनानुसार या विद्यालयाचे भाट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमासाठी मांडकी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवितके, केंद्रप्रमुख नंदकुमार जवरत, चिपळूण तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शैलेश सुर्वे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 14/Dec/2024