AUS vs IND : खेळ थांबला ! तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस पावसाचा, रविवारी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

AUS vs IND | क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. अखेर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या दिवशी फक्त पहिल्या सत्रातील 13.2 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने या झालेल्या खेळात एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 14-12-2024