देवरूख महाविद्यालयात कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा उत्साहात

देवरुख : शहरातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कै. द. ज. कुलकर्णी कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत कोकणातील विविध भागांतील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण मीरा पोतदार आणि डॉ. वर्षा फाटक यांनी केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मीरा पोंक्षे (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), द्वितीय क्रमांक वेदांत वकटे (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), तृतीय क्रमांक कावेरी चव्हाण (अण्णासाहेब बेहरे महाविद्यालय, लवेल) आणि उत्तेजनार्थ उमा तावडे (माध्यमिक आश्रम शाळा ज्युनिअर कॉलेज, निवे), श्रुती पाटील (गुरुवर्य काकासाहेब सप्रे कॉलेज, देवरुख) यांची निवड करण्यात आली.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 14/Dec/2024