माखजन हायस्कुल येथे व्यक्ती चित्राचे प्रात्यक्षिक

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे व्यक्ती चित्र रेखाटण्याचे प्रात्यक्षिक झाले.

यामध्ये माखजन इंग्लिश स्कूल व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

हे प्रात्यक्षिक देण्यासाठी देवरुख येथील डी कॅड चे प्राध्यापक विक्रम परांजपे उपस्थित होते.प्रा विक्रम परांजपे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व शिक्षक गणेश शिंदे यांचे व्यक्ती चित्र रेखाटत उपस्थितांचे लक्ष वेधले.
दरम्यान प्रा विक्रम परांजपे यांनी व्यक्तिचित्र रेखाटताना प्रकाश, शरीरशास्त्र यांचा अभ्यास महत्वाचा असतो असे सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

श्री परांजपे यांनी व्यक्ती चित्र रेखाटने व अन्य कलांमध्ये कशा पद्धतीने करिअर करू शकतो व कशा संधी उपलब्ध आहेत.याविषयी सविस्तर सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,प्रा अभिजित सुर्वे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 14-12-2024