दहावी-बारावी परीक्षा वेळापत्रक आता मिळणार मोबाईल अॅपवर

रत्नागिरी : विद्यार्थी तसेच पालक यांना परीक्षेचे वेळापत्रक तसेच प्रारूप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका आदी माहिती आता मोबाईल अॅपवर मिळणार आहे. तसे अॅप महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केले आहे.

राज्य मंडळाचे संकेतस्थळ असले तरी सध्याच्या काळात मोबाईल वापर अधिक प्रमाणात केला जातो. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र मोवाईल अॅप उपयुक्त ठरणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरून, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील दुव्याद्वारे अॅप विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे.

विद्यार्थी, पालक शिक्षकांना दहावी- बारावीच्या परीक्षा राज्य मंडळासंदर्भात सोशल मीडियावरील माहितीची सत्यता अॅपद्वारे पडताळून पाहता येणार आहे. अॅपद्वारे दहावी-बारावीची परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, गेल्या दोन वर्षातील प्रारुप प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि अन्य सूचना माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.

चुकीच्या माहितीमुळे संभ्रम
गेल्या काही वर्षांत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या एमबीएसएसई या मोबाईल अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 14/Dec/2024