खेड : बांगला देशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज वतीने खेड शहरातून भव्य मोर्चा नुकताच काढण्यात आला. खेड शहरातून व्यापारी, विद्यार्थी सर्व राजकीय लोकप्रतिनिधी हे यावेळी उपस्थित होते. शहरातील समर्थनगरमधून बाजारपेठ, गुजर आळी एस.टी. स्टँड मार्गे कासार आळी, ब्राह्मण आळीकडून तहसीलदार कार्यालयात सांगता करण्यात आली.
यावेळी श्री. आयरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बांगला देशमध्ये अल्पसंख्याक हिंदू धर्मियांवर जे अत्याचार होत आहेत, त्याचा यावेळी निषेध करण्यात आला. या पुढे जेव्हा जेव्हा हिंदूंवर संकट येईल तेव्हा आम्ही एकजुटीने रस्त्यावर उतरू, असे सांगितले. या मोर्चात ‘हिदू धर्म की जय, जय श्रीराम’ अशा घोषणांनी परिसर दणानुन गेला होता. बाजारपेठेत सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनाच्या कालावधीत आपली दुकाने बंद ठेवून मोर्चामध्ये सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 14/Dec/2024














