रत्नागिरी : नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात आमदार उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिक एकवटले होते. मी शपथ घेतो की… असे म्हटल्यानंतर लगेचच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. घोषणांचा पाऊस सुरू झालय. पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
महायुतीमधील घटक पक्षांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल सायंकाळी झाला. यावेळी आमदार सामंत यांनी शपथ घेतली.
शपथविधीसाठी त्यांना एक दिवस आधीच निरोप मिळालेला होता त्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळी कार्यक्रमावेळी जयस्तंभ येथील कार्यालयात जिल्हाप्रमुख राहुल पंडित, गजानन पाटील, राजन शेट्ये, शिल्पा सुर्वे, स्मितत पावसकर, आमदारांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांच्यासह शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शपथ घेतल्यानंतर लगेच फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.
झेंडे फडकवून कार्यकर्त्यानी आनंद साजरा केला, याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले, ‘आमदार सामंत यांनी आतापर्यंत पदाला योग्य न्याय दिलेला आहे. मागीलवेळी उद्योग विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती तेव्हा राज्यात विविध उद्योगविषयी संकल्पना राबविल्या, त्याचबरोबर अनेक उद्योगही राज्यात आणले. यामुळे यावेळी पुन्हा जे कोणतेही खाते त्यांना मिळेल, त्यात ते निश्चितच आपले कतृत्व सिद्ध करतील, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांना मिळाले तर रत्नागिरीचा चांगला विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 16/Dec/2024














