देवरूख परिसरातील वीजपुरवठा आज ९ तास बंद

देवरुख : येथील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी आज सोमवार १६ रोजी देवरुख परिसरातील विद्युत पुरवठा ९ तास बंद ठेवण्यात येणार आहे. देवरुख उपकेंद्रामधील ११ केव्ही देवरुख फीडर, आंगवली फिडर, हडपुडे फिडर, वांझोळे फिडर, पांगरी फिडर हे सकाळी ९ वाजल्यापासून सायं. ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तालुक्यातील ३३ केव्ही संगमेश्वर- देवरूख लाईन मेंटेनन्स व लाईनवरील झाडे तोडण्यासाठी नियोजित वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा चालू करण्यात येईल, याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 16/Dec/2024