संगमेश्वर पोलिस ठाण्यातील चंद्रकांत कांबळे यांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती

संगमेश्वर : संगमेश्वर पोलिस स्थानकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत कांबळे यांची महाराष्ट्र पोलिस खात्यातील उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलिस प्रशासनाकडून पोलिस चंद्रकांत कांबळे हे लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तपास उलघडून पोलिस खात्याचे नाव लौकिक केले आहे. त्यांच्या या यशामुळे संगमेश्वर परिसर तसेच लांजा पुनसमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

माझे वरिष्ठ पोलिस अधिकारी, सहकारी पोलिस तसेच जिल्हा पोलिस अधिकारी आणि सहकार्यामुळे मी यशस्वी झालो व पदोन्नतीचा मला मान मिळाला, असे चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 16/Dec/2024