रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या महिलांचे बेमुदत उषोण आंदोलन शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले. रखरखत्या उन्हाची तमा न करता मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी आपल्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३ हजारपेक्षा जास्त महिला आणि कर्मचारी या उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.
२०१४ पासून सुरू असलेल्या उमेद अभियानात जिल्ह्यातील हजारो महिला आणि त्यांचे व्यवस्थापन अधिकारी असे अनेक कर्मचारी या अभियानात काम करत आहेत. मात्र २०२५ मध्ये अभियान बंद करण्याचा फतवा राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. याविरोधात शुक्रवारी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. शासनाने नियमित सेवेत घ्यावं आणि अभियान असच सुरू ठेवावं या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 28-09-2024