ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर २१ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने ते आता लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू नेते रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी रविवारी दिली.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे निवडून आले आहेत. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचे टार्गेट आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्याचे जवळजवळ निश्चित झाले. काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांना यापुढे पक्षात त्यांच्यावर संघटनात्मक मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेत दिले होते. आता चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 16-12-2024













