प्रकल्प विरोधी दृष्टिकोन बदलला पाहिजे : किरण सामंत

लांजा : राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात चांगले उद्योग आणूयात. प्रत्येक प्रकल्पाला विरोध हा नकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधू-रत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी निवसर येथील कार्यक्रमात केले. तसेच निवसर गावाला सुमारे साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

निवसर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘शासनाच्या योजना पक्ष संघटनेमार्फत राबवण्यात येणार आहेत. निवसर गावात विकास कामे करत राहणार आहे. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रश्न सोडवणार आहोत. तालुक्यात चांगले उद्योग आणूया. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. काही नतद्रश्ट मंडळींनी प्रकल्पांना विरोध केला. रत्नागिरी जिल्ह्यात विकास करणे फार सोपे आहे. पडीक जमीन उद्योगांना देण्याची मानसिकता ठेवू. भूलथापा मारणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध हा ठपका पुसून काढला पाहिजे.

गाव भेट दौऱ्यांतर्गत किरण सामंत यांनी तालुका पिंजून काढला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील निवसर सडा शिंदेवाडी येथे बैठक घेतली. बैठकीवेळी तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, बाबा भिंगार्डे, अनिल धाडवे, दत्ताराम गुरव शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख चंद्रकांत घाटकर, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, बंडू शिंदे, गवाणे विभाग संघटक विवेक कांबळे, विभाग प्रमुख अल्ताफ काझी, तालुका सचिव वसंत घडशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 17-09-2024