आ. योगेश कदम यांनी शपथ घेताच मंडणगडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मंडणगड : विधानसभेच्या निवडणुकीत दापोली मतदार संघातून निवडून आलेले आ. योगेश कदम यांनी नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मंडणगड तालुक्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दापोली विधानसभा मतदार संघास ४९ वर्षांनंतर राज्यमंत्रिपदाचा मान मिळाला असल्याने दापोलीसह पूर्ण मतदारसंघात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वी आ. बाबूराव बेलोसे यांनी १९७५ साली मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यानंतर ४९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मतदरासंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आमदार योगेश कदम यांच्या रुपाने संपुष्टात आला आहे. आ. कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य चौकात येऊन फटाक्यांची आतषबाजी करीत जयघोष केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, चेतन सातोपे, अनंत लाखण, विनोद जाधव, योगेश जाधव, अस्मिता केंद्रे, दोस्तमहमंद चौगुले, सेजल गोवळे, प्रवीण जाधव, राजा लेंढे, निलेश गोवेळ, संदीप कदम, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, निलेश सापटे, गणेश काटकर, अझहर मुकदाम, राजेंद्र आंबेकर, नागेश घोसाळकर, गजानन तांबुटकर, संजय शेडगे, मनोज शिंदे, निलेश रक्ते, संजय राणे, आजीम कडवेकर, विनीत रेगे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 16/Dec/2024