लांजा : लांजा शाळा केंद्र क्र. १ अंतर्गत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जि.प. शाळा केळबे येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेप्रसंगी राजन देसाई, शिवसेना तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, एस. एन. कांबळे, गणेश लाखन, मानसी आंबेकर, सरपंच दीपाली कांबळे, केंद्र प्रमुख चंद्रकांत पावसकर, उपसरपंच सचिन विभूते, सामाजिक कार्यकर्ते संपत खानविलकर, नयना वालकर, रामदास खानविलकर, संतोष वाझे, पोलिस पाटील रोहित कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कैलास खानविलकर, विवली शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कांबळे यांसह अन्य उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांचा लांजा केंद्रातील शाळांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकार घेण्यात आले. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार किरण सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 16/Dec/2024














