रत्नागिरी : नाखरे ग्रामपंचायत सरपंचपदी विद्या जाधव

पावस : रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे गावच्या सरपंचपदी विद्या जितेंद्र जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये प्रथमच बौद्ध समाजाला सरपंचपद मिळाल्याने गावामध्ये आनंद साजरा करण्यात आला.

सन २०२० मध्ये झालेल्या नाखरे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेने नऊपैकी नऊ जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले. सरपंचपद ओबीसी महिला गटाकरिता राखीव असल्याने गेल्या दोन वेळेला सदस्य म्हणून निवडून आलेल्या व प्रशासकीय कामकाजाची व सरपंचपदाची चांगल्या तऱ्हेने अभ्यास असल्याने शुभदा सुभाष नार्वेकर यांना सरपंचपदी बसवण्यात आले. परंतु, त्या वेळेला उपसरपंचपदी विजय शांताराम चव्हाण यांना नियुक्त करण्यात आले. त्यावेळेला अडीच वर्षानंतर बौद्ध समाजाला सरपंचपद देऊ, असे आश्वासन दिले होते. ओबीसी महिला आरक्षण असतानादेखील केलेला शब्द पाळण्याकरिता विद्या जाधव यांना संधी देण्यात आली.

निवडी वेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कांचन नागवेकर, विनया गावडे, पावस महिला आघाडीप्रमुख स्वाती शिंदे, माजी सरपंच सुहास जाधव, बौद्ध समाज मंडळाचे समन्वयक कमलाकर जाधव, सागर वैद्य, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश चव्हाण, एस. के. कालकर पोलिस पाटील, सुधीर वाळींबे मोहन जाधव, दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 16/Dec/2024