गुहागर : गुहागर तालुक्यातील तळवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विहिरीचे भूमिपूजन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. पी. केळस्कर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. ग्रामपंचायत तळवली येथे काल पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी (गट अ) पी. पी. केळस्कर यांनी भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनिल पवार यांच्या सिंचन विहिरीचे लाभार्थी यांच्या शेतावर जाऊन या कामाचे भूमिपूजन केले. तसेच गावातील मोदी आवास व रमाई आवास घरकुले यांची पाहणी, फळबाग लागवड, बायोगॅस, एमआरइजीएस विहीर, कच्चे बंधारे, जलजीवन कामे, टाकी इत्यादी कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी एस. कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. बागुल, ग्रा. पं. कर्मचारी, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 16/Dec/2024














