चिपळूण : चिपळूण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकारिणीची सोमवार, दि. १६ रोजी सायंकाळी ४:३० वा. महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक पागझरी येथील विद्यालयात होणार आहे. बैठकीला पक्षाचे आमदार शेखर निकम यांच्यासह तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीला पक्षातील संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, महिला शहर अध्यक्षा आदिती देशपांडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 16-12-2024














