रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना आता ‘अपार’ सक्तीच

रत्नागिरी : सन २०२५-२६ या नव्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला कायमस्वरूपी १२ अंकी ओळख क्रमांक काढावा लागणार आहे. आधारनंतर विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात २०२५- २६ या शैक्षणिक वर्षापासून अपार कार्ड सक्तीचे असेल, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन इलेक्शन अशाच पद्धतीने एक राष्ट्र एक विद्यार्थी कार्ड अशी संकल्पना आहे.

अपार या मराठी शब्दासाठी ऑटोमेटेड परमनंट अॅकॅडमी अकाऊंट रजिस्ट्री असे नाव आहे. अपार म्हणजेच स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी. हे कार्ड तथा विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सरकारद्वारे बनविले जाईल. विद्यार्थ्याचने शाळा, कॉलेज बदलले तरी त्याचा अपार आयडी एकच राहील. अपारसाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड तसेच डीजी लॉकर खाते असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे केवायसीदेखील पूर्ण असले पाहिजे.

या अंतर्गत विद्याथ्यर्थ्यांना एक अर्ज दिला जाणार असून, तो अर्ज पालकांकडून भरून घेतल्यावर अपलोड होईल. त्यानंतर त्याचे कार्ड बनवून विद्यार्थ्यांना दिले जाईल. त्यासाठी फी द्यावी लागणार नाही. सध्याच्या एबीसी आयडी म्हणजेच अॅकॅडमिक बैंक क्रेडिटच्या पुढचा हा टप्पा आहे.

आधार अन् अपार लिंक…
सध्याचे आधार आणि अपार कार्ड एकमेकांशी संलग्न असतील; जसे की सध्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे. अपारदेखील आधार कार्डला लिंक केले जाईल. त्यामुळे डीजी लॉकरसारखे हे देखील एक एज्युलॉकर असेल की ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात आपोआप संकलित केली जाईल. विद्याथ्यनि कोणत्या इयत्तेत कुठे, कसे शिक्षण पूर्ण केले, त्याची गुणवत्ता, त्याचे इतर शिक्षण संलग्न कौशल्य, निपुणता, त्याची बक्षिसे, त्याचे प्रमाणपत्र, त्याचा प्रवेश, अशी सर्व माहिती एकत्र असेल, तो विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेत असेल तर त्याची अॅडमिशन फी, शेष परीक्षा फॉर्म परीक्षा वेळापत्रक कॉलेजच्या सर्व सूचना, त्याची परीक्षा फी, कॉलेजकडून त्याला वेळोवेळी दिल्या गेलेल्या सूचना, परीक्षेसाठी हॉल तिकीट, त्यानंतर त्याचा निकाल ते अगदी त्याचे डिग्री सर्टिफिकेट देखील अपार आयडीद्वारे त्याला मिळू शकेल. अपार आयडीची नोंदणी महाविद्यालयांमध्ये शाळा, केल्यानंतर त्यासाठी पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

जिल्ह्यात ८२ टक्के नोंदणी
एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अपार नोंदणीत रत्नागिरी जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ३४२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८७ विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे

असे आहेत अपारचे लाभ
विद्यार्थ्यांना बस प्रवासात सवलत, परीक्षेचे शुल्क भरणे, सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश, विद्यार्थ्यांना पुस्तके व स्टेशनरीवर सवलत, मनोरंजन पार्क किंवा वसतिगृहामध्ये सवलत, प्रत्येक टप्प्यानंतरचे पुढील शिक्षण व तत्सम असे अनेक लाभ या अपार कार्डचे आहेत. विद्यार्थ्यांना स्वतः लादेखील त्याचे सर्व अॅकॅडमिक रेकॉर्ड एका कार्डद्वारे सहज कुठेही, केव्हाही उपलब्ध होईल. संगणक तंत्रज्ञानातील क्लाऊड आधारित विद्यार्थ्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रांचा दस्तऐवज सांभाळणारे जणू हे एक डॉक्युमेंट वॉलेट असणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नाने व सूचनानुसार आतापर्यंत ३० कोटींहून अधिक अपार नोंदणी झाली आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र अशी ही महत्त्वकांक्षी अशी ही अपार योजना असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 16/Dec/2024