हिवाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण सुरू

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे हिवाळी हंगामासाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण दि. १४ डिसेंबरपासून ऑनलाईन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर सुरु झाले आहे. मुंबईतून दोन तसेच पुण्यातून एक अशा तीन विशेष गाड्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. ऐन हंगामात या गाड्या सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 16/Dec/2024