राजापूर : जांभवली माळ येथे ४ जानेवारीला राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राजापूर : राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा ४ जानेवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तालुक्यातील जांभवली माळ राजापूर रेल्वेस्टेशन येथे श्रीगणेश आडीवरेकर मित्रमंडळ राजापूरच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता या बैलगाडी शर्यतीचे उ‌द्घाटन आ. किरण सामंत यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण आ. उदय सामंत व आ. किरण सामंत यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

या स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्याला ५१ हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक २५ हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक १५ हजार व मानाची ढाल. जिल्हास्तरीय प्रथम ३१ हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक १५ हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक दहा हजार व मानाची ढाल. तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक दहा हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक पाच हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक तीन हजार व मानाची ढाल, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

शर्यतीचे आयोजक केळवली विभागप्रमुख नाना कोरगावकर व पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी असून अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीगणेश आडीवरेकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 16/Dec/2024