पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कायम पाठीशी : आ. शेखर निकम

चिपळूण : कोकणातील संस्कृती, परंपरा टिकविण्याबरीवरच स्वच्छतादेखील महत्वाची आहे. त्यातूनच पर्यटनाला चालना देता येईल, केवळ एक दिवस कार्यक्रम करून पर्यटन वाढणार नाही. त्यासाठी सातत्य हवे. कोकणच्या पर्यटन विकासासाठी आपण आमदार म्हणून सर्व प्रयत्न करणार आहोत. या पुढेही पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असे मनोगत आ. शेखर निकम यांनी चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २६) चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील पर्यटन व निसर्गप्रमी, विविध संस्थांच्या सहकायनि पर्यटन व शांतता या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासनाच्या पर्यटन विभागाचे हनुमंत रेडे, न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले, ग्लोबल संस्थेचे राम रेडिज, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे, भूमी प्रतिष्ठानच्या प्रा. मीनल ओक, ॲक्टीव्ह ग्रुपचे कैसर देसाई, कृषी पर्यटन विषयका अभ्यासक संजीव अणेराव, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. निकम यांनी सांगितले की, चिपळूण नगर परिषद व शहरातील निसर्गप्रेमी, पर्यटनप्रेमी संस्थांनी असे उपक्रम कायमस्वरूपी राबवावेत. एक दिवस कार्यक्रम घेऊन पर्यटनाला चालना मिळणार नाही. पर्यटन वाढीसाठी खन्या अथनि सातत्य हवे. कोकणातील पर्यटन वाढीसाठी येथील संस्कृती व परंपरा त्याचबरोबर स्वच्छतेला महत्त्व आहे. कोकणातील पर्यटन वाहण्याकरिता आपण शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळविण्यासाठी पाठपुरावा करू व पर्यटनामध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी उभे राहू,

यावेळी हनुमंत होडे यांनी शासनाच्या पर्यटनविषयक योजनांची माहिती दिली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात वामन साडविलकर यांनी लिहिलेल्या कोकण गीतगायनाने उत्तरा भागवत साडविलकर, शर्वरी कुडाळकर यांच्या सादरीकरणाने झाली, त्यानंतर निसर्ग व पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक बापू काणे यांनी केले, तर धीरज बाटेकर यांनी चिपळूणच्या इतिहासाची माहिती दिली. ‘कोकणातील धार्मिक पर्यटन व संतसाहित्य’ या विषयावर धनंजय चितळे यांनी माहिती दिली. योगेश बांडागळे यांनी सांस्कृतिक पर्यटनावर मनोगत व्यक्त केले.

दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
कार्यक्रमात पक्षी निरीक्षक व अभ्यास नयनीश गुळेकर यांनी पक्षी आणि पर्यटन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले, यावेळी सांस्कृतीक केंद्राच्या गॅलरीमध्ये चिपळूण शहर परिसरातील आढळणाऱ्या दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आ. निकम यांनी हे प्रदर्शन पाहून नयनीश गुळेकर यांचे कौतुक करीत सन्मान केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 28/Sep/2024