◼️ अध्यक्षपदी कु.झैनब लांबे आणि सचिवपदी निधी मुळ्ये यांची निवड
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी पुरस्कृत ‘रोटरी इंटरॅक्ट क्लब’ ची स्थापना करण्यात आली, पदग्रहण सोहळाला इंस्टॉलेशन ऑफिसर श्री.राहुल पंडित, असिस्टंट गव्हर्नर शाल्मली आंबूलकर, पोदारचे प्रिंसिपल श्री.राकेश चव्हाण, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.रुपेश पेडणेकर, सचिव ॲडव्होकेट मनिष नलावडे, ट्रेसरर माधुरी कळंबटे, इलेक्ट असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत भुर्के, इलेक्ट प्रेसिडेंट प्रमोद कुलकर्णी, सिनियर रोटेरिअन धरमसी चौहान, विनायक हातखंबकर, परेश साळवी, पोदारचे को-ओरडीनेटर आसिया बंगाली उपस्थित होते.
रोटरी क्लब रत्नागिरी पुरस्कृत इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूल हा चार्टेड क्लब असून पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न झाला. इन्ट्रॅक्ट क्लब आंतरराष्ट्रीय स्थरावर कार्य करणारा १२ ते १८ वयोगटातील मुलांचा क्लब असून, उद्देश विद्यार्थ्यांन मध्ये लीडरशिप निर्माण करणे तसेच गरजूना मदत, सामाजिक कार्य,व जनसेवेची भावना शालेय जीवना पासूनच निर्माण करणे हा आहे.
पदग्रहण प्रसंगी इन्ट्रॅक्ट क्लबचा अध्यक्षपदी कुमारी झैनब लांबे यांना इंस्टॉलेशन ऑफिसर रोटेरिअन राहुल पंडित यांचे हस्ते मानाची कॉलर प्रदान करण्यात आली.सचिवपदी निधी मुळ्ये,खजिनदारपदी देवम जैन,व्हॉइस प्रेसिडेंटपदी पारस नायक,बोर्ड ऑफ डायरेक्टर अर्जुन नलावडे, नीरज गुंदेजा, अस्मि साळुंखे, ईशा रॉय, ओम कारे, श्रीयांश वाघाटे,एरिनी कांबळे, ख्याती दिवेकर, पूर्वा चव्हाण,रुद्र बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच एकूण ३४ इन्ट्रॅक्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
पदग्रहण सोहळाचे सूत्रसंचलन माधुरी कळंबटे यांनी केले.इन्ट्रॅक्ट स्थापने साठी पोदारचे अमोल शिवलकर सर ,आरवी पाटील मॅडम यांनी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 17/Dec/2024














