रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्या सूचनेनुसार वाटद जिल्हा परिषद गटात रविवारी (ता. १५) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये 70 जणांनी रक्तदान केले. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत खंडाळा आरोग्य केंद्रात शिबिर झाले. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, नांदिवडे सरपंच आर्या गडदे, वरवडेचे माजी सरपंच निखिल बोरकर, खंडाळा आरोग्यकेंद्राच्या प्रमुख डॉ. श्रुती कदम, रत्नागिरी सिव्हिलकडून डॉ. थोरात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 17/Dec/2024














