रत्नागिरी : ४१ हजार मताधिक्याने पाचव्यांदा निवडून आल्यावर ना. उदय सामंत यांनी थेट मुंबई गाठली होती. यामुळे विजयी मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर दिनांक २२ डिसेंबर रोजी मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीत येणार आहेत. यावेळी सायंकाळी ५ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यासाठी कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात येत आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर आता उदय सामंत यांना वजनदार खाते मिळणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे. मंत्रिपद मिळाल्यावर प्रथमच सामंत रत्नागिरीत येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 17/Dec/2024














