रत्नागिरी : बोट बांधण्याच्या लोखंडी पाईपला अडखळून पडलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील बोट बांधण्याच्या लोखंडी पाईपला अडखळून पडलेल्या अज्ञात तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार १५ डिसेंबर रोजी दुपारी १.१५ वा. सुमारास घडली.

हा अज्ञात तरुण मिरकरवाडा येथील समीना जेट्टी नवीन मच्छीमार्केटच्या मागे दारु प्राशन केलेल्या स्थितीत होता. तो जेटीवरील बोट बांधायच्या लोखंडी पाईपला अडखळून पडल्याने त्याच्या डोक्याला, नाकाला तसेच गालाला गंभीर दुखापती झाल्याने तो बेशद्ध पडला. त्याला तेथील काही नागरिकांनी उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 17/Dec/2024