दापोली : लोखंडी साहित्याने भरलेला ट्रक खेडकडून दापोलीच्या दिशेने येत असताना कुवेघाटी वळणावर ट्रकमधील साहित्य मागे सरकले. यामुळे ट्रक उभा झाला. सुदैवाने ट्रकच्या मागे अन्य वाहने नसल्याने अपघाताचा अनर्थ टळला आहे.
दि. १४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातानंतर क्षमतेपेक्षा वाहनांची अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक अवघड घाट पार करत असताना ट्रकमधील लोखंडी साहित्य अचानक मागे सरकले. त्यामुळे ट्रकचा पुढील भाग उचलला गेला. सुदैवाने गाडी दरीत कोसळली नाही.
खेड दापोली या मार्गावर रोज अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, याबाबत पोलिस यंत्रणा आणि परिवहन विभाग ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. या पूर्वी देखील दापोली-खेड मार्गावर काळकाईकोंड येथे ट्रकमधून लोखंडी सळ्या बाहेर पडून अशाचप्रकारे अपघात झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 17/Dec/2024














