रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १५ डिसेंबर रोजी रात्री ८.१० वा. सुमारास करण्यात आली. संतोष गोविंद ठिक (५२, रा. तिवंडेवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो आपल्याकडे दारू पिण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 17/Dec/2024














