ठाणे : संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६८
वर्षांचे होते. संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी हे पं. राम मराठे यांचे मूळ गाव. संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता.
आपले धाकटे गायक बंधू मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी ‘संगीत मंदारमाला’ हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आजही त्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यांच्यावर सोमवारी ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. संजय मराठे यांच्या पश्चात युवा गायक भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 17/Dec/2024














