देवरुख : एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे कोकणातील (खेळे) नमन हा कार्यक्रम दिनेश दादा कुडतरकर निर्मित कोकण कलामंच मुंबई हा कोकणातील नामांकित असलेल्या नमन मंडळचा कार्यक्रम गोकुळ सेवा संस्थेचे पुढाकाराने ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. झवेरबेन हॉल, घाटकोपर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
गोकुळ सेवा संस्था तांबेडी गवळवाडी ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी व गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबई यांच्या वतीने अनेक वर्ष मुंबईसह चिपळूण-संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मुंबईत चिपळूण संगमेश्वर भागातील समाज बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा, पंचक्रोशीतील महिलांसाठी कौटुंबीक स्नेहमेळावा, हळदीकुंकू, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उद्योजकता शिबिरे आदी विविध कार्यक्रम घेतले जातात.
या उपक्रमांमध्ये संदीप भालेकर यांचा मोलाचे मोठे योगदान असते. सर्व युवकांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते कार्यक्रमाचे आयोजन करत असतात संदीप भालेकर उबाठा सेनेचे हिंगोली विधानसभा संपर्क प्रमुख, कोकण महोत्सव सहसचिव म्हणून काम करतात. नमन कार्यक्रम राबविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
गावात व पंचक्रोशीतील युवकांना विश्वासात घेऊन एकत्र करत स्वतः पुढाकार घेऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने संदीप भालेकर यांनी माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, सुभाष बने, शिवसेना नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, रोहन बने, अविनाश कांबळे यांचे मदतीने पंचक्रोशीतील अनेक विकास कामे ही करून घेतली आहेत.
मंडळाच्या या नमन (खेळे) कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळालेल्या आदिती तटकरे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
नमनप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 17/Dec/2024














