लांजा : लांजा तालुका वारकरी संघटनेची नूतन कार्यकरिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी ह. भ. प. गोविंद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या बाबत संघटनेची बैठक नुकतीच लांजा येथील पौलस्तेश्वर मंदिर येथे पार पडली. या बैठकीत संघटनेची नूतन निवडण्यात आली. कार्यकारिणी नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ह. भ. प. गोविंद चव्हाण यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रकाश कुंभार, कार्याध्यक्षपदी मनोहर रणदिवे, सचिव म्हणून राजन शेट्ये, खजिनदारपदी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली.
याचबरोबर नव्या कार्यकारिणीवर विष्णू लांजेकर, उमेश बेर्डे, चंद्रकांत पवार, संतोष कुर्णेकर, रमेश घुमे, सुभाष राणे, विजय वाडेकर, मोहन वेल्ये, संतोष पांचाळ, राजाराम करंबेळे, दत्तराम पालये, प्रकाश रामाणे, गणपत माटल, विश्राम नामये, दर्शन आग्रे, पांडुरंग शिंदे, मनोहर शिंदे, दिगंबर मोरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 17/Dec/2024














