रत्नागिरी : जिंदाल वायुगळती बाधितांना प्रत्येकी दोन लाखाची भरपाई देण्याची मागणी

रत्नागिरी : जिंदाल कंपनीच्या वायुगळतीचा फटका ६८ विद्यार्थी आणि एका महिलेला बसला. त्याला कंपनीचा हलगर्जीपणाच जबाबदार असून, बाधित ६९ जणांना प्रत्येकी दोन लाख रुपये जिंदाल कंपनीने द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली.

ते म्हणाले की, वायुगळतीच्या तक्रारीबरोबर कोळशाची पावडर आणि राख या परिसरातील वस्तीवर पसरते, त्याविषयी ही नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांकडे जनतेने तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे जाधव यांनी सांगितले. आताचे वायुगळती प्रकरण थोडक्यात निभावले, भोपाळसारखी दुर्घटना घडली असली तर मोठे संकट ओढवले असते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 17-12-2024