पावस : स्वामी स्वरूपानंद यांच्या १२२व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातर्फे रविवारी (ता. १५) रत्नागिरीतील लक्ष्मीचौक ते अध्यात्म मंदिर अशी बालदिंडी काढली.
या दिंडीमध्ये रत्नागिरी शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थी विविध वेशभूषा करून दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे जयंत देसाई, ऋषिकेश देसाई, आनंद देसाई, काळे, भावे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 17-12-2024














