विकासातून विरोधकांना गप्प बसवू : आ. किरण सामंत

लांजा : कोणीही कितीही जोर लावू द्या, आपण विकासाच्या माध्यमातून विरोधकांचा मनसुबा उधळून लावूया. त्यासाठी सर्व नागरिकांची साथसोबत हवी आहे. नागरिकांचा विश्वास हाच माझ्या कामाची पोचपावती आहे, असे प्रतिपादन किरण सामंत यांनी पडवण येथे केले.

लांजा तालुक्यातील पडवण येथील शिवसेना उबाठाच्या तालुका पदाधिकाऱ्यासह गावातील २०० नागरिकांनी शिवसेनेमध्ये (शिंदे गट) पक्ष प्रवेश केला. युवासेना व उबाठा सेनेचे पदाधिकारी असलेल्या दोन शाखाप्रमुख, तीन युवासेना पदाधिकारी, दोन ग्रामपंचायत सदस्या व एक गावप्रमुख अशा मुख्य पदाधिकारी असलेल्या उबाठा सेनेच्या शिलेदारांनी साथ सोडल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विकासकामांबाबत नाराजी व्यक्त करून लांजा व राजापूर तालुक्यांतील शिवसेना उबाठाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा एकप्रकारे धडाकाच लावला आहे. लांजा तालुक्यातील पडवण येथील उबाठाचे युवासेना विभाग अधिकारी सुरज कुडतडकर, शाखाप्रमुख विजय कुळये, उपशाखाप्रमुख दयानंद रांबाडे, युवा सेना शाखाधिकारी कृष्णा रांबाडे, गावप्रमुख यशवंत जाधव, विनोद बराम यांनी नागरिकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 17/Dec/2024