◼️ पावस येथे २३ ला अंतिम फेरी
पावस : येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत् संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरी राज्यभरातील ६ केंद्रावर पार पडल्या असून एकूण १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरी स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव कार्यक्रमादरम्यान २३ डिसेंबरला दुपारी ३ वाजता समाधी मंदिराच्या रंगमंचावर पार पडेल.
स्वामी स्वरूपानंद रचित संजीवनी गाथा या ग्रंथरुपी पुस्तकातील अभंगांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने संजीवनी गाथेतील अभंगांची राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा श्री स्वामी सेवा मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येते. यावर्षीची प्राथमिक फेरी नुकतीच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि अकोला येथील केंद्रांवर पार पडली.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झालेले केंद्रनिहाय स्पर्धक पुढीलप्रमाणे : पुणे केंद्र : प्रथम- सौ. मेघना जोशी, द्वितीय- सौ. मधुरा गोडबोले; रत्नागिरी : प्रथम- सृष्टी तांबे, द्वितीय- गौतमी वाडकर; कोल्हापूर : प्रथम- अमर पाटील, द्वितीय- सचिन जाधव, मुंबई : प्रथम- सौ. भाग्यश्री पालकर-पावसकर, द्वितीय- निळकंठ आंबये; ठाणे : प्रथम- चैतन्य फाटक, द्वितीय- नंदन जोशी. या स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत स्पर्धा होईल. यातून राज्यस्तरीय विजेते निवडण्यात येतील.
प्रत्येक केंद्रातील प्राथमिक फेरीतून तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तीनपैकी दोन स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख म्हणून हेमंत गोडबोले काम पाहात असून अंतिम फेरीसाठी स्वामी भक्त तसेच संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 17-12-2024














