चिपळूण : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची दि. १८ रोजी सकाळी १०:३० वा. अभिरूची सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी विधानसभा निवडणूक तसेच संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व सेलचे तालुकाध्यक्ष, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला आघाडीच्या राधा शिंदे, शहर अध्यक्ष रतन पवार, डॉ. रेहमत जबले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 17/Dec/2024














