दापोली : शहरी रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दापोली : दापोली शहरातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील बांधवांना पक्के आणि सुरक्षित घर बांधण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. शहरी रमाई आवास योजनेंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे या समाज घटकांतील योजनेसाठी पात्र व्यक्तींनी पक्के घर बांधण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.

दापोली शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बहुसंख्य समाज बांधवांना सुरक्षित निवारा नाही अशांनी रमाई आवास योजनेंतर्गत या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मालकी हक्काची कागदपत्रे, तसेच सहहिस्सेदाराची समंतीपत्रासह नोंदणीकृत अभियंत्यांमार्फत बांधकाम परवानगी आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 17/Dec/2024