वालावलकर रुग्णालयात कानाच्या मोफत मशिनसाठी आजपासून नावनोंदणी

चिपळूण : वालावलकर रुग्णालय डेरवणच्या वतीने दि. २१ रोजी कानाच्या मशिनचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दि. १७ ते २० डिसेंबर दरम्यान रुग्णांनी नावनोंदणी करून कानाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वालावलकर रुग्णालयाचे कान-नाक- घसा तज्ज्ञ डॉ. प्रतीक शहाणे यांनी केले आहे. या शिबिरांतर्गत २० रुग्णांना कानाची मशिन देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 17/Dec/2024