देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे शेवरवाडी येथील ओंकार मित्र मंडळाच्या वतीने २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. स्पर्धेत प्रथम चार क्रमांकास आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. यात वैयक्तिक उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दि. २९ रोजी रात्री ११ वाजता होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 17/Dec/2024














