रत्नागिरी : जॉली स्पोर्टस्, दापोलीतर्फे जॉली स्पोर्ट्स क्लब, एस. टी. डेपो दापोलीच्या बाजूला, दापोली येथे दि. २८ व २९ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ कुमार गट, ५ कुमारी गट ६ किशोर गट व ७ किशोरी गट अश सात गटात खेळवली जाणार आहे.
प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे; अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून साईप्रकाश कानिटकर व कैलास देवळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जॉली स्पोर्ट्सचे अध्यक्ष अरुण गांधी, सचिव श्रीराम माजलेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 17/Dec/2024














