वेरळ मार्गावरील धुळीवर अखेर डांबरीकरण

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. वेरळ येथील चौपदरीकरणातील प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गावर धुळीच्या साम्राज्याने वाहनचालक जेरीसच आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खात्याने अखेर ही बाब गांभियनि घेत शुक्रवारी रातोरात धुळीवर डांबरीकरण’ करून वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दिलासाच दिला आहे.

वेरळ मार्गावर धुळीच्या साम्राज्याने वाहनचालकांसह नजीकचे रहिवासी व पादचारी अक्षरशः मेटाकुटीस आले होते. महामार्ग खात्याचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देवून बोळवणच करत होते. या बाबतची वस्तूस्थिती राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने वेरळ मार्गावर डांबरीकरण करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मार्गावर रातोरात डांबरीकरणही करण्यात आले. या डांबरीकरणामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दिलासाच मिळाला आहे. या मार्गावर धुळीमुळे नागरिकांचे आजारपणही वाढले होते डांबरीकरणामुळे यातूनही सुटका झाली आहेया मार्गापाठोपाठ भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणीही तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:51 PM 17/Dec/2024