रत्नागिरी : महिलांच्या तक्रारींची आज जनसुनावणी

रत्नागिरी : राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज (ता. १८) सकाळी ११ वा. नियोजन भवन, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी केले आहे.

चाकणकर आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 18-12-2024