रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘छंदोत्सव २०२४’च्या रंगमंचीय कार्यक्रमांची सुरुवात दिमाखदार अशा शोभायात्रेने व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी व कै. मालतीताई जोशी यांच्या प्रतिकात्मक चित्ररथाने करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी ढोल पथकात तर विद्यार्थिनीं लेझीम पथकात सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत अग्रभागी नटराजाची मूर्ती असलेली पालखी सुशोभित करून मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलापासून ते खातू नाट्य मंदिरापर्यंत वाजतगाजत आणण्यात आली. याप्रसंगी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांनी शोभायात्रेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, नियामक मंडळाचे सदस्य मनोज पाटणकर, संस्थेचे विश्वस्त विवेक भावे आदी उपस्थित होते.
याबरोबरच मागील ३०वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या शामराव करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्योजक राजन मलुष्टे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गणेश गुळवणी आणि शशिकांत महाजन यांनी एकांकिका स्पर्धांचे परीक्षण केले. विविध फिलर्सनी यावेळी विद्याथ्यर्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल
या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे प्रतीक असणारे पेहराव परिधान केले होते. काही विद्यार्थ्यांच्या गटांनी फूड स्टॉल मांडले होते. या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले देश-विदेशी विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 18-12-2024














