रत्नागिरी : विठ्ठल मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात उद्या बारा तास अखंड नामस्मरण

रत्नागिरी : शहरातील विठ्ठल मंदिर परिसरामध्ये सहा वर्षांपूर्वी स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराची स्थापना झाली. त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी (ता. १९) सकाळी ७ ते सायंकाळी ७ असा बारा तास अखंड नामस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्री स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण भक्ती करण्याच्या अनेक साधना सांगितल्या जातात. त्यामध्ये नामस्मरण ही एक सहजसोपी साधना, चित्त शुद्ध आणि मन एकाग्र केलं की, परमेश्वराच्या समीप पोहचण्याचा सोपा मार्ग. ही सुवर्णसंधी मिळणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंदिर येथे. हा नामस्मरणाचा कार्यक्रम सर्व स्वामीभक्त, सर्व भाविकांसाठी खुला असून सकाळी पाच वाजता महाराजांची पूजा, सव्वासहा वाजता परिसरातील सर्व देवदेवतांना निमंत्रण, साडेसहा वाजता वीणासहित वाद्यवृंद पूजा आणि सात वाजता वीणा तार छेडून नामस्मरणाला सुरवात होईल. दिवसभर नामस्मरण चालू राहून सायंकाळी मंदिरातील सायंकाळच्या आरतीने सात वाजता सांगता होईल. ज्या भक्तांना वीणा येती घेऊन नामस्मरण करायचे असेल त्यांना वेळेनुसार संधी देण्यात येईल. दत्तप्रसाद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप रहाटे, संतोष शिर्के यांच्यासह अनेक स्वामीभक्तांच्या सहकायनि या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. सर्व भाविकांनी नामस्मरणाचा लाभ वेळेनुसार घ्यावा, असे आवाहन प्रमोद रेडीज यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 18/Dec/2024