मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार निरंजन डावखरेंची नियुक्ती

रत्नागरी : मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेवर (सिनेट) भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले. तसेच ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून, एमपीएससीसाठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मंजूर करून घेतले. मुंबई विद्यापिठाच्या कक्षेत कोकणातील पाच जिल्ह्यांतील महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा, आदी करण्यामध्ये आमदार डावखरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 18/Dec/2024