रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा तत्काळ घ्या

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा बँकेची रद्द केलेली नोकर भरती परीक्षा तत्काळ घ्या आणि उमेदवारांना दिलासा द्या, कधी परीक्षा होणार ते जाहीर करून योग्य ते केंद्रदेखील जाहीर करावे; अन्यथा थेट बँकेसमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्हा सहकारी जिल्हा बँकेमध्ये २०० जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रथम अर्ज करून एक हजार रुपये भरल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी निमंत्रित करण्यात आले. काही केंद्रावर परीक्षा घेण्यात आली; परंतु खेडमधील लोटे येथे घरडा कॉलेज केंद्रावर परीक्षेच्यावेळी इंटरनेटचे कारण पुढे करून परीक्षा रद्द करण्यात आली. गणपती उत्सवानंतर ही परीक्षा घेतली जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

आता गणोशोत्सव संपून एक आठवडा उलटला तरी परीक्षेचा पत्ता नाही किंवा इच्छुकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 28-09-2024